सुकलेल्या पानासारखे,
भीभीरते माझे मन,
चुरगाळून फेकावे जसे,
उडून आकाशात तरगांवे जसे,
पानापानांच्या देठामध्ये,
दवबिंदूचे अस्तित्व,
हरवावे असे,
सुकलेल्या पानासारखे
हिरमुसलेले माझे मन.
पावसाच्या सरीमध्ये,
कागदाच्या नावामध्ये,
मातीच्या सुगंध मध्ये,
दही दिशा दरवळेलेले,
माझे मन,
सुकलेल्या पानासारखे,
आसुसलेले माझे मन.
©poojathole
P