S

माझी सखी

प्रेमाचा हात धैर्याची साथ
दुखातही आनंदाचा सहवास
घडवणारी अशी माझी सखी
तिच्या स्वप्नात माझ्या संसाराची स्वप्न रंगवी
कर्तव्याला माझ्या तीनेच स्फूर्ती दयावी
तीची कल्पना मी सत्यात उतरावी
तेव्हा यशाची मी घेईल भरारी
अशी माझी सखी
तिच्या हातची मीठ भाकरी
स्वाद देई अमृतापरी
जीवनाची आस लावी
तीच माझी अर्धांगिनी
तीच माझी स्वप्नंसुंदरी
अशी माझी सखी
एकरूप होऊनी योग घडावा
संतती प्राप्तीचा ध्यास लागावा
कुळास दिवा लावणारी
माझ्या जीवनाला उध्दारी
अशी माझी सखी
सुनिल घरडे
©sunilll