S

माझं काय?

तुझं काय आणि माझं काय?
मोह मायेच्या बाजारात माझं काय अन तुझं काय हेच नाही कळलं
शेवटी काय तर कपाळाला फक्त एक रुपयाचं नाणं आलं
बालपणात हसता खेळतांना पुस्तकं हातात आलं
शाळेत प्रवेश घेऊन गुरुचं दर्शन झालं
गुरूच्या दानानं जीवनाला बळ आलं
इथे बालपणाचं पर्व कसं संप्ल
हेच नाही कळलं
मोह माहेच्या बाजारात तुझं काय
अन माझं काय हेच नाही कळलं
जीवनाचा पाया पक्का झाला तारुण्याच्या पदार्पणात मोह मायेला उधाण आलं
अर्धांगिनीचा हातात हात घेऊन गुलाबी रातीचं स्वप्नं गोड झालं
संसार रुपी जीवनात पैशाला
मोल आलं
मोह मायेच्या बाजारात माझं काय अन तुझं काय हेच नाही कळलं
म्हातारपणाचं पर्व मोहाच्या फाशात पडलं
धन दौलत इज्जत कमावून कष्टाचं फलीत झालं
शेवटीं माझं काय? संप्ल रे संप्ल
इथेच सगळं सोडलं
मोह मायेच्या बाजारात माझं काय अन तुझं काय हेच नाही कळलं
शेवटी काय तर कपाळाला
फक्त एक रुपायच नाणं आलं
सुनिल घरडे
©sunilll