मातृभूमीच्या रक्षणार्थ सर्वस्व
अर्पण करणारा असतो तो मनमौजी
ज्याला म्हणतो आपण फौजी.
लढन्यासाठी शत्रूशी नेहमी असतो गंभीर
नसते कसलीही भीती त्याला असतो खंबीर!
नाही फेडता येईल असे उपकार त्यांने केले
कीतीदा तरी आपल्या प्राणांची आहुती दिले
कधीही नाही मातृभूमीच्या रक्षणार्थ खचला
न कधीही परकीय शंत्रू पुढे झुकला!
देशाच्या रक्षणासाठी दिले आपले प्राण
वाढविला नेहमी देशाचा मानसन्मान
वंदन करावे त्याला त्याचे कार्य खूप महान
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर उभा असतो ठाम!
मातृभूमीच्या संरक्षणार्थ लढतो सीमेवर
आम्हा सर्वांना वाटतं त्याचा अभिमान
जेव्हा-जेव्हा देशांवर संकट आले
लावून दिली पणाला आपली जान
युद्धात विजय मिळवून वाढवली देशाची शान
खरचं फौजी आहे खुप महान!
@...उमेंद्र बिसेन...@
©ubisen
U