S

महात्मा गांधी

आज आहे जयंती महात्माची ।।
आणि असणारच ती एक महान आत्माची ।।१।।

म्हणतो आपण त्यांना राष्ट्रपिता ।।
अन तेच आहेत एकमेव शांतीदाता ।।२।।

त्याचे आत्मचरित्र आहे ‘सत्याचे प्रयोग’ ।।
व अन्यायच होता त्याच्या जीवनाचा रोग ।।३।।

ते आहेत स्वतंत्रसेनानी ।।
त्याची तर अनोखीच आहे कहाणी ।।४।।

ते होते एकमेव करणारे सत्याग्रह ।।
त्याचा होता कायम शांततेचा आग्रह ।।५।।

त्यांना चीड होती कायम अन्यायाची ।।
अन ते जगाला शिकवण देत होते प्रेमाची ।।६।।

त्याचे नाव होते गांधी मोहनदास ।।
त्यांनीच केले जगाला सत्याचे दास ।।७।।

ते आहेत आपले महात्मा ।।
त्याचे कायम अमर असेल आत्मा ।।८।।

©shivam.22