S

महिला उद्धारकर्ती

मला स्वाभिमान मीच खरा भाग्यशाली
मला कन्या रत्नाची प्राप्ती झाली
स्पर्धेच्या युगात तिने बाजी मारली
ज्ञान अन प्रयत्नाने यशाची मानकरी झाली
तल्लख बुद्धीने सखोल ज्ञानाने
उच्च पदाची मानकरी झाली
मला स्वाभिमान मीच खरा भाग्यशाली
मला कन्या रत्नाची प्राप्ती झाली
ती जगाचा स्वाभिमान जगाला उद्धारी
देशाची महिला पंतप्रधान झाली
तिने देशाला बलिदान दिलं
इंदिराची सुवर्णं अक्षरात नोंद झाली
मला स्वाभिमान मीच खरा भाग्यशाली
मला कन्या रत्नाची प्राप्ती झाली
कोटी कोटी अभिवादन त्या जिजाऊला
शिवबा सारखा राजा घडवला
ज्याने स्वराज्याची स्थापना केली
मला स्वाभिमान मीच खरा भाग्यषाली
मला कन्या रत्नाची प्राप्ती झाली
धन्य हो त्या भीमा माऊलीची
भीमराया सारख्या रत्नाला जन्म दिला
ज्या भारत रत्नाने घटना लिहिली
स्त्री अन पुरुष समानतेची दिशा दिली
मला स्वाभिमान मीच खरा भाग्यशाली
मला कन्या रत्नाची प्राप्ती झाली
कन्या जन्माचा सन्मान करा
ती जगाची जननी तीच स्वामींनी
सावित्री बाई फुलेनी स्त्री शिक्षणाची संधी दिली
महिला जगाची उद्दारकरती झाली
मला स्वाभिमान मीच खरा भाग्यशाली
मला कन्या रत्नाची प्राप्ती झाली
सुनिल घरडे
महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा
©sunilg