J

मित्रांच्या खुणा....

मित्रांच्या खुणा....
खूप झाला त्रास आयुष्य जगताना ,
एकटेपणा वाढला सार जग असताना,
न कळतच आयुष्यात अनेक किस्से घडले ,
अनेक जण खांद्यावर डोक ठेवून रडले ,
प्रत्येक नात्यागणि क  लोक भेटली मला ,
हृदयाच्या कप्प्यात मात्र मित्रांच्याच खुणा ,
काही बस्तीत भेटले काही मस्तीत भेटले ,
माझ्या सुखात नाचले दु:खात रडले ,
काहींनी वाटेतून दूर केले ,
काहींनी वाटेवर नेले ,
शर्यतीत सोबत नसले तरी ,
लढताना मात्र नेहमीच पुढे दिसले ,
कॉल उचल्यावर गोड शिवी येते ,
कॉंटॅक्ट नाही झाला तर त्यांची स्वारी घरी दिसते ,
माझ्याच घरात हक्काने शिरतात ,
वर आपलाच घर समाजून मित्र पठ्ठे मलाच बोलतात ,
साले ते पण काय दिवस होते ,
साई बाबांच्या मंदिराबाहेर सर्वच भेटत होते ,
पहिला येईल तो बिचारा रांगेत उभा राहायचा ,
काकू हा माझा मित्र आहे बोलून प्रत्येक जण रांगेत घुसायचा ,
आज सार जगच बदलल ,
नोकरीच्या मागे आयुष्यच रेंगाळल ,
पण whatsapp च्या त्या खोपट्यात ,
पुन्हा मैत्रीचं जग उजाडलं ,
मित्रांच्या त्या मैत्रीला आज सलाम करतो ,
मित्रांना सोबत पाहून गर्वाने फुलतो ,
मित्रांच्या त्या मैत्रीला आज सलाम करतो ,
मित्रांना सोबत पाहून गर्वाने फ़ुलतो……
SwaraKavya
©jaysrd2109