N

◆मन माझं...◆

माझ्यातला मी सोडल्यास
मन तुझं मला दिसतं
मग तुझ्या आठवणीत
माझ्याच मनाला फसवतं
इच्छाही काही नसताना
अपेक्षाच काय ठेवणार
प्रिये तुझ्याशिवाय जीवनात
आणखी काय राहणार
देव नाही विश्वासाविना
मग तु कशी असणार
माझ्या मनातील उत्प्रेक्षेशिवाय
मी तुझा कसा असणार
खरंच मन आतूनच रडतं
ते एकटंच असं असतं
खोटे स्वप्न पाहिल्यावर
त्या स्वप्नातच फसतं
★★निलेश इंगोले★★
©nilesh2016