मृत्यू तर अटळ आहे ।
त्याच्यावर विजय मिळवणे कठीण आहे ।।१।।
नाही ते प्रत्येकाला जमते ।
काव्यामद्ये मन रमते ।।
वय काममद्ये खपते ।
पंतप्रधान झाल्यामुळे देश पुढे सरते।।२।।
होते ते एक महान विचारवंत ।
असणार ते काव्यातील कलावंत ।।
होतील साफ भारतातून भ्रष्टाचाराचे जंत ।
नाही होणार कधी त्यांचा अंत ,
नाही होणार कधी टीवनच अंत ।।३।।
नाव हवं त्याचे अटल ।
पण मृत्यू देखील आहे त्याचे अटळ ।।
परंतु नाव राहणार त्याचे अटळ ।
करण ते आहेत पंतप्रधान वाजपेयी अटल ।।४।।
कलावंताची कला कधी मारत नाही ।
त्याच्यासारखे कार्य कोणी करत नाही ।।
मृत्यू मुळे देश कधी मागे सरत नाही ।
दुःख कोनी हातात धरत नाही ।।५।।
अटल बिहारी वाजपेयी आहे त्यांचे नाव ।
कधी कोणी विचारले नाही त्यांना त्यांचे गाव ।।
आहेत ते भारताचे भारतरत्न ।
नाही कोठे मिळणार त्याच्यासारखे रत्न ।।६।।
©shivam.22
S