G

नारी

कधी न संपणारे शक्तीचं आभाळ तू
सर्वसहन शीलेचा प्रताप तू
तूच आहे या नव्या युगाचं कुसुम
ना भिती तूला काळ्या काळोखाची
आणि साथ त्या नव्या उजेडाची
तुझ्यात जी क्षमता, ती नाही कुठेही.
अनेक वेदना सहन करून,
करतेस नऊ महिने गर्भात पालन तू
शिवरायांना जन्म देणारी तूच,
येसूबाई सारख्या शुर बाईच्या जन्मात येणारी तूच
माया जागल्यावर जवळ घेणारी तूच,
आणि महिषासुराचा वध करणारी दुर्गा तूच.
आई, ताई, मुलगी अशा अनेक रूपात तू
नारीत्व आपलं घडवते.
कधी न थकून तू रोज मेहनत करते.
म्हणूनच,
'बाई ही शिवबाची तलवार, बाई ही रणरागिणी हुशार'
©ganeshkama