जन्मताची जन्म ना कळे
जीवन हे प्रत्येकाला अपुरे पडे
प्रत्येक क्षण जगण्यासाठी रडे
कळणार नही इथे कुणाला
जन्म आणि मृत्यूचे नाते कसे जुळे
जीवन हा मायेचा पसारा
कोण देईल कुणाला सहारा
इथे मोहाचा लागेना किनारा
येता दुःखाची अवकळा
तेव्हा सुखाची महती कळे
अन कर्म आणि काळाची मैत्री जुळे
प्रत्येक क्षण सुखासाठी रडे
कळणार नाही इथे कुणाला
इथे जन्म अन मृत्यूचे नाते कसे जुळे
अवगुण दुर्गुण घेती मोहाचा सहारा
स्वाभिमानावरच होइल कलांकाचा मारा
गुन्हेगार तूच तुझा वाहतील अश्रूंच्या धारा
भोग आपला आपणची भोगावा
लागेना इथे माणसाला माणसाचा थारा
कर्तृत्वानेचं यशाची महती कळे
जिद्ध ठेवता ध्येय गाठण्याचे
यशही तुझ्या पायाशी लोळे
प्रत्येक क्षण हा जगण्यासाठी रडे
कळणार नाही इथे कुणाला
जन्म अन मृत्यूचे नाते कसे जुळे
सुनिल घरडे
©sunilll
S