S

नातं माणुसकीच

दुनिया खूप रंगीन आहे
तुला इथे प्रत्येक रंग पारखयचा आहे
कारण इथे माणुसकीने माणुसकीच नातं जपायचं आहे
जीवनाच्या प्रवाहात विचारांच्या नावेतून प्रवास करायचा आहे
प्रवासात त्या दुनियादारीच नातं अन जबाबदारीच ओझं तुला वाहायचं आहे
कारण इथे माणुसकीने माणुसकीच नातं जपायचं आहे
मार्ग तुझा चुकला तर अपयश आणि अपराध्याचे खापरं तुझ्यावर फुटतील
मायेच चक्र तुला स्वार्थाच्या जाळ्यात अडकवणार आहे
त्या स्वार्थाचाच तुला त्याग करायचा आहे
कारण इथे माणुसकीने माणुसकीच नातं जपायचं आहे
तुझी वाट तुझा मार्ग तुलाच शोधायचा आहे
यशाचा केंद्रबिंदू तुला गाठायचा आहे
परिवर्तन घडवून तुला तुझ अस्तित्व टिकवायचं आहे
कारण इथे माणुसकीने मनुवाकीच नातं जपायचं आहे
नकली मुखवट्यातुन खरा असली चेहरा पारखायचा आहे
कोळशाच्या खाणीतून जसा हिरा गवसतो तसा माणसातून माणूस शोधायचा आहे
कारण इथे माणुसकीने माणुसकीच नातं जपायचं आहे
माणसाने इथे माणुसकीचा वध केला आहे
राग हा माणुसकीचा शत्रू आहे
तुला रागावरच विजय मिळवायचा आहे
कारण इथे माणुसकीने माणुसकीच नातंजपायचं आहे
सुनिल घरडे
©sunilll