निसर्गाचे वर्णन......
काय वर्णू निसर्गाच्या सौंदर्याला
शब्द अपुरे पडतात त्याला!
निसर्गाने आपल्याला भरभरून दिला
सुर्याच्या रूपाने जीवन प्रकाशमय केला
पाण्याच्या रूपाने तृष्णा भागविला
वृक्षाच्या रूपाने प्राणवायू दिला
काय वर्णू निसर्गाच्या सौंदर्याला
शब्द अपुरे पडतात त्याला!!
पृथ्वीतलावर प्राणी वृक्ष जनजीवन
निर्माण केला,
उदरनिर्वाहासाठी शेतजमीन,वने
जलाशय पोषक वातावरण निसर्गाच्या
सान्निध्यात मिळाला
माणवी जिवन मनमोहक आणि
मंगलमय सुख समाधानी बनविला
काय वर्णू निसर्गाच्या सौंदर्याला
शब्द अपुरे पडतात त्याला!!
निसर्गराजा तुझ्या सौंदर्याची करूणा अपार
हिरव्या हिरव्या चादरांनी सौंदर्य बहरले फार
तुझ्या अप्रतिम सौंदर्य लाभल्याने
तृप्त झाले सारे संसार
निसर्ग हाच आहे एकमेव आधार
काय वर्णू निसर्गाच्या सौंदर्याला
शब्द अपुरे पडतात त्याला!!
@उमेंद्र युवराज बिसेन@
©ubisen
U