S

नरदेही जन्म मोलाचा

नरदेही जन्मला हा जन्म मोलाचा,,
वारसा जपायचा माणुसपानाचा
जगणं सुंदर आहे जगायचं असतं
अपेक्षेप्रमाणे कधी घडत नसतं
वेलीला फुल उमंलल नाहीं म्हणून वेल तोडायची नसतं
अस्तित्व बनवून मार्ग मिळेल जगण्याचा
नरदेही जन्मला हा जन्म मोलाचा
जे आपलं असेल तेच हक्कानं घ्यायचं
कर्म अन नियतीन घडलं ते भोगायचं
संकटाचा ध्यर्याने प्रतिकार करायचा
नरदेही जन्मला हा जन्म मोलाचा
ज्ञान आत्मसात करून वाटावा प्याला अमृताचा
अहंकारात गुरफटला तर प्याला विषाचा
मधुर वाणी सत्संग घडवेल जीवनाचा
नरदेही जन्मला हा जन्म मोलाचा
मुंग्या लागणार नाहीत मिठाच्या खड्याला
दुरूनही लागती मुंग्या साखरेच्या कनाला
विचार करून वापरावा शब्द अन शब्द मोलाचा
मिळेल सन्मान जन्मानाचा
नरदेही जन्मला हा जन्म मोलाचा
वारसा जपायचा माणुसपनाचा
सुनिल घरडे
©sunillllll