जीवनाचं फलित तुझ्या कर्मातच दडलंय
जे पेरलं ते उगवेल हे नियतीच ठरलंय
कर्माचा अन पापाचा वाटेकरी कोणी नाही
हे वाल्या कोयाने जाणलंय
वाल्याचा वाल्मिकी झाला हे प्रायश्चित घडलंय
जीवनाचं फलित तुझ्या कर्मातच दडलंय
जे पेरलं ते उगवेल हे नियतीचं ठरलंय
घाण चिखलातच कमळ फुलतंय
दुर्गंध नयेता कमळाचा सुगंधच दरवळतोय
दुर्गुनाचा करता प्रतिकार सद्गुनाचा साक्षात्कार घडतोय
जीवनाचं फलित तुझ्या कर्मातच दडलंय
जे पेरलं ते उगवेल हे नियतीच ठरलंय
अज्ञान अन अंधारात दुखच दडलंय
पण प्रकाशमय ताऱ्याच चमकन नाही थांबलंय
अज्ञानमय अंधाराची करता मात ठरतो तारा प्रकाशमय
जीवनाचं फलित तुझ्या कर्मातच दडलंय
जे पेरलंय ते उगवेल हे नियतीच ठरलंय
नरदेही जन्मला तुला ध्येय गाठायचं
सद्गुण सत्कार्मात पुण्य निश्चित घडतंय
जन्माच अवघड गणित तुलाच सोडवायचं
जीवनाचं फलित तुझ्या कर्मातच दडलंय
जे पेरलं ते उगवेल हे नियतीच ठरलंय
सुनिल घरडे
©sunilll
S