S

पोरीचं पारडं भारी झालं

आतातं भाऊ लय कठीण झालं
पोरायले बायको भेटणं मुश्किल झालं
माय परेशान बाप परेशान
लय पोरी पाऊण सोयरीकच नाहीं जमलं
पोरी पायता पायता वय चुकून गेलं
आतातं भाऊ लय कठीण झालं
पोरायले बायको भेटणं मुश्किल झालं
आजच्या पोरीनं वाढवला शिक्षणाचा साज
हुंडा मागणाऱ्यांचा उतरवला माज
सून म्हणून तिले तुमी लय छेळलं
आता तं भाऊ लय कठीण झालं
पोरायले बायको भेटणं मुश्किल झालं
पोरावाल्यायचे आता वाजले बारा
आतातरी स्त्री जन्माची आस धरा
स्त्री जन्मानं जीवनात मानाचं स्थान आलं
आतात भाऊ लय कठीण झालं
पोरायले बायको भेटणं मुश्किल झालं
सुनिल घरडे
©sunillllll