F

प्रेम...

प्रेम काय आहे ?
एकमेकांची तात्पुरती भेट की
आयुष्यभराचा साथ..
प्रेम हा कायमचा विश्वास एका चा
दुसर्‍या प्रतीचं
एकमेकांच्या सोबत नसतानाही सोबत
असण्याचा आभास
कालांतराने एकमेकांचा श्वास
नक्कीच प्रेम मूर्ख किवा अपरिपक्व आहे
एकदा पडलेत ना प्रेमात की मग दिशा सापडेना होते पण तेव्हाच जेव्हा तो दिशा दाखवणारा आपला प्रेम सोबत नसतो
आणि प्रेमाचा काय हो अगदी वेळा असतो
हल्ली दिवसा स्वप्नं पाहायला शिकवतो
कधी कधी तर पुढचा काय बोलतो त्यापेक्षा अधिक त्याच्या मनातला न बोलता जाणून घेतो
स्वतःला त्रास होईलही पण दुसर्‍याच्या सोबत असतो
सोबत असणा किवा नसणा प्रेम म्हणता येणार काय सोबत नसतानाही एकमेकांसोबत वचनबद्ध  असणे हे प्रेम नाही का?
प्रेम बांधिलकी आहे का?
सोबत असताना जर बांधल्यासारखं  होतय त्याला प्रेम म्हणाता येणार काय?
कदाचित बांधिलकी आपल्याच लोकांशी असते ना..
पण प्रेम म्हणजे जीव एकमेकांचा एकमेकांवर
काळजी एकमेकांची एकमेकांवर
धडपड एकमेकांच्या स्वप्नांसाठीसाठीची
आनंद एकमेकांच्या यशाचा
प्रेम म्हणजे ना कमाल आहे
अगदी जादू  जस लपंडाव
प्रेम हे अगदी नि:स्वार्थ आणि निखळ असत
त्याला कुठलाही भेद नाही कुठलाही स्वार्थ नाही
अगदी वाहणारा वेळेसोबत नाहनारा
प्रेम हे प्रेम आहे त्याला कुठलीही परिभाषा नाही फक्त प्रेम आहे...
©fearlessr