N

◆"प्रेमातील एक क्षण"◆

काल-परवाचे चेहरे जणू जन्माची ओळख,
बोले ऐसा जणू त्यांना जगाची पारख,
थरथरलेले ओठ जसे पावसात मनसोक्त चिंब,
प्रेम हे तुजवरी जणू तळ्यातलं प्रतिबिंब,
उसळलेल्या भावना जणू सागराच्या लाटा,
एकजीव झाल्या जणू जंगलाच्या वाटा
यौवन रस ग्रहण करण्या झाले कसे दंग,
जणू होळीतल्या अंगांचा झाला एक रंग।।
★ ★ ★
©nilesh2016