S

प्रेमकाव्य

सुरुवात आयुष्याची .....
अंधार पसरला दाट
चौफेर काळोख्याची रात
धवल शुभ्र चांदण्यानी
ही सजली नवी रात ......
वारा बोलतो श्वासात
अन होतो तुझा भास
माझ्या गालावर लाज
देई तुझा सहवास .....
एक एक पाऊलांनी
करु जीवनाचा प्रवास
हात घेऊनी कवेत
भरवू एकमेका घास .....
अंगनी मेघाची बरसात
संगे साथ सोबत्याची
येत्या नवीन वर्षात
करू सुरुवात आयुष्याची ......
- शितल महादाने
©shituniks