*कितीदा नव्याने तुला आठवावे*
कितीदा नव्याने तुला आठवावे
स्वप्नातल्या सरिने नवे रंग ल्यावे
बहुदा तुला मी निरखून पाहावे
आंसवांत या चिंब भिजून जावे ...
कितीदा तुझ्यासाठी मी हसावे
पक्षांपरी उंच गगणी उडावे
तुझे गीत ओठातूनी मीच गावे
तालात त्या जीवन सुरेल व्हावे ....
डोळ्यात माझ्या मी तुजला जपावे
बघता तुला भान हरवून जावे
हृदयातुनी मी कविता लिहावे
माझे मला मी विसरून जावे......
~ शितल महादाने
21 Dec 2019
©shituniks
S