*हृदय भावना* .......
प्रेमाच्या कविता मनाच्या दारातून
वेड्या कवीप्रमाणे रोज मी लिहिते
प्रेम हे माझे शब्दांतून न बोलता
स्वछंदपणे कवितेतून व्यक्त करते
नाही कळत तुला अबोल प्रेम माझे
मी नजरेच्या भाषेतून मांडलेले
निर्मळ भावनांचे ते विलक्षण मोती
हळुच माझ्या हृदयातून सांडलेले
तुझ्या नुसत्या भासानेही श्वास हे
सुसाट वाऱ्याप्रमाणे धावतात माझे
हृदयी माझ्या फक्त आस तुझी
अन जवळ नुसते आठवणीचे ओझे
का असे होते का असे वाटते
सुखाच्या झुल्यात मन हे झुलते
हळूच आनंदात, हळूच वेदनेत
नेहमी डोळ्यातले अश्रू डुलते ....
- शितल महादाने
30 डिसें. 2019
©shituniks
S