प्रणाम महामानवाला
---------------
प्रत्येक काळजावर काळानं वारं घातला
बाबा तुमच्या जीवावर मरणाने डाव साधला
तुमच्या मरणाने प्रत्येक आत्मा अन आत्मा रडला
बाबा तुमच्या मुळे आमच्या जगण्याला अर्थ आला
जातीयतेच्या धर्मान्ध राक्षसांनी आमचा खूप छळ केला
पण तुमच्या लेखणीनं आमच्या जीवनाचा कायापालट झाला
शेणातले हात काढून आमच्या हातात पेन आला
बाबा तुमच्या जीवावर मरणाने डाव साधला
तुमच्या मरणाने प्रत्येक आत्मा अन आत्मा रडला
शिक्षणाचे दारं उघडून ज्ञानाचा मार्ग दावला
अंधश्रद्धा आणि अडाणीपणाचा अंत झाला
स्वाभिमान आणि शिष्टचारानं जगण्याचा आम्हा मान मिळाला
तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण आम्हा सद्गुण देऊन गेला
बाबा तुमच्या जिवावर मरणाने डाव साधला
तुमच्या मरणाने प्रत्येक आत्मा अन आत्मा रडला
प्रत्येक थोर महान मानव तुमच्या ज्ञानासमोर झुकला
संविधान देऊन जगात मान मिळवून दिला देशाला
पशु पक्षी मानव प्रत्येकाच्या रक्षणाचा साक्षत्कार झाला
कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला
बाबा तुमच्या जीवावर मरणाने डाव साधला
तुमच्या मरणाने प्रत्येक आत्मा अन आत्मा रडला.....
- सुनिल घरडे
©sunilll
S