P

प्रश्नचिन्ह

/ बुद्धी पात्रता संपली आता
काय करावे कळत नाही
एवढेच मजला ठाव आता
प्रश्नाचे उत्तर काही सापडत नाही
प्रश्नास त्या प्रश्न केला मी
प्रश्नाचे उत्तर सांग मला
प्रश्नाने उत्तर असे दिले की
प्रश्नाचा अर्थच मला उमगला नाही
प्रश्नाची प्रशंसा करावी तर
प्रश्नास अर्थच ठाउक नाही
प्रशंसा करावी उत्तराची तर
म्हणतोय असा की " माहीत असूनही मी सांगणार नाही "
प्रश्नाची व्यथा सद्य स्थितीत प्रश्नचिन्हासारखी आहे
कारण त्याचे उत्तर हेच एक प्रश्नचिन्ह आहे
आणि उत्तराची व्यथा ही पूर्णविरामासारखी आहे
कारण त्याचा पूर्णविराम हाच एक प्रश्नचिन्ह आहे
प्रश्नाच्या प्रश्नचिन्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे की
नेमका प्रश्न काय आहे
आणि उत्तराच्या पूर्णविरामाला मात्र प्रश्न असा पडला आहे की
जर उत्तरातूनच प्रश्न उद्भवला तर काय होईल याचा...
एकंदरीत काही अस आहे सगळे
©pushkarp