पाखरांचे थवे संपले मोरांचे नाच थांबले
कोकिळेचे मधुर सुर आज का मंदावले?
विरळ झाले अरण्य सारे
केले अतिक्रमण अन आधीपत्ये तू
गाजवले
माणसांच्या गर्दीत आता साम्राज्य माणसाचे माजले
पाखराचे थवे संपले मोरांचे नाच थांबले
कोकीळेचे मधुर सुर आज का मंदावले?
संस्कृतीने सजलेले वाडे आज इथे पाडले
जीर्ण झाल्या हवेल्या इथल्या
मनातले प्रेमाचे झरे का आटले
माणुसकीचे तुटले नाते स्वार्थाचे धुके दाटले
पाखराचे थवे संपले मोरांचे नाच थांबले
कोकीळेचे मधुर सुर आज का मंदावले ?
सुनिल घरडेy
©sunilg
S