T

शाळा

शाळेत वर्ग भरलेला होता
प्रत्येक विषय तास ठरलेला होता,
अ-तूकडी हूशार विद्यार्थ्यांची
ब- मध्यम वर्गाची
क- मधील मंदबूध्दी
मनात भावना भरलेल्या होत्या.
हेच शाळेच माध्यम
जीवन जगतांना हळूवार,
मी रोजच पाहीलेल्या होत्या.
परी ती शाळा आई सारखी
भांडण,खेळण ,एकमेका रागवण
कट्टी घेतल्यानंतर सो घेणे,
सार काही कर्माने
अलगद मनी बिंबवल्या होत्या.
परी आता सार काही लूप्त झाल
लूप्त झाली मैत्री व शाळा,
व्हाटसप करी आठवणीचा
उजाळा उजाळा.
कवी- सचिन बाबूराव ठाकरे
(सरकार)