अबोला होतो मज बोलत केलं
कधी प्रेम कधी धपाटा मारून,
निरक्षराला साक्षर केलं
रोजच गणित,मराठी,हिंदी
तासावरती तास चाले
मनी ईतिहासाचे धडे बिंबवले ,
भूगोलाव्दारे आम्हा,
अलगद जग दाखविलं.
अबोला होतो ...... साक्षर केलं
मास्तर आमचा मायबाप
नाही केला आम्ही परीपाठ,
वाटे डोक्याला देई रोजच ताप
परी चांगल आम्हा शिकवलं.
अबोला होतो ...... साक्षर केलं
पण आज मास्तराच रूपांतर
ईंग्रजीतल्या सरात झाल,
ते मारणं वेळोवेळी प्रेम करणं
जगी केव्हाच बूडालं .
अबोला होतो ...... साक्षर केलं
आता ईंग्रजी शाळा आल्या
वही पेन लँपटाँपची हूकूमत,
पाट्या पेन्सील हद्दपार झाल्या
सार जग डिजिटल झालं.
अबोला होतो ...... साक्षर केलं
मार खावून आम्ही रडत
जात होतो शाळेत,
मूलांना जाण्या करीता गाडी
सार काही नवल झालं.
अबोला होतो मज बोलत केलं
कधी प्रेम कधी धपाटा मारून,
निरक्षराला साक्षर केलं .
कवी -सचिन ठाकरे(सरकार)
संपर्क -८४५९८०९४५०
T