S

शब्द मोम शब्दची आग

शब्द मोम शब्दची आग आहे
शब्दाला शब्द जुळता प्रेम ओसंडून वाहे
गुम्फीता शब्दांची माळ
वाजती मृदूंग अन टाळ
मधुर सुरांनी अध्यात्म अंतरी वाहे
शब्द मोम अन शब्दची आग आहे
शब्दाला शब्द जुळता प्रेम ओसंडून वाहे
गुम्फीता शब्दांची माळ
आत्म्याला परमात्म्याची लागे आस
ईश्वराचा होई भास, मनी भक्ती रस वाहे
शब्द मोम आहे शब्दची आग आहे
शब्दाला शब्द जुळता प्रेम ओसंडून वाहे
शब्द रचियता लावणी मदहोश घडली
ढोलकीच्या तालाने घुंगराला बोल फुटली
मोहून टाके सुर लावणीचा मादकता बहरूणं वाहे
शब्द मोम आहे शब्दची आग आहे
शब्दाला शब्द जुळता प्रेम ओसंडून वाहे
सुनिल घरडे
©sunilg