S

शब्द सुर

शब्दांना सुर येता
भावनांचे पेव फुटले
वाक्याला अर्थ आला
शब्दांचे यमक जुळले
शब्दांना सुर येता
भावनांचे पेव फुटले
सुर मधुर पडता कानी
मुक्यालाही बोल फुटले
शब्दांना सुर येता
भावनांचे पेव फुटले
तान्हूल्याला निज येता
गाता आई अंगाई
तान्हूलेही शांत झोपले
शब्दांना सुर येता
भावनांचे पेव फुटले
कान्हा वाजवी बासुरी
आस लागे अंतरी
पान्हा फुटे गाईला
दूधही कसे पाझरले
शब्दांना सुर येता
भावनांचे पेव फुटले
सुर अन शब्द जुळता
गवळणीचे स्वर गुंजले
भाराऊन जाता राधा
नाचता घुंगरू तुटले
शब्दांना सुर येता
भावनांचे पेव फुटले
सुनिल घरडे
©sunilg