K

शेतकरी

दिवाळीचा सण येऊन टेपला
राजकारनी म्हणत आहेत ,
''दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पण दादा माझ्या राजा धन तर घरी येन्या आधिच पावसाने वाहून चालय ,
तुमच्या शुभेच्छा नी माझ्या शेतकरी
राजाच पोट नाही भरत .
तुमच्या घरी धनाची पूजा होत असेल
पण माझ्या राजाच कष्टाच धन अजुनही त्याच्या हाती लागत नाहिये.
दिवाळी आली माझा शेतकरि राजा 5 महीने राबराब
राबला तरिही त्याला मात्र कष्टाच फळ मिळत नाहिये
तेव्हा फक्त एकच विनंती आहे ,
माझ्या राजा वर निसर्ग कोपला आहे, तिथ आपण काही करु शकत नाही,
परंतु सरसकट ओला दुष्काळ जाहिर करुन
तात्काळ मदत तुम्ही नक्कीच करु शकता .... !!
कृपा करून आश्वासन देन बंद करा थकलाय माझा राजा
त्यालाही दिवाळी आनंदाने साजरि करु दया एवढीच विनंती .....🙏🙏🙏
असंख्य जबाबदार्या आहेत, माझ्या लेकिला माहेरि अनायचय पन तिला काय खाऊ घालु ????
तिला साडी कशी घेउ ????
याच विचारात आज माझा राजा मरतो आहे !!!!!
परंतु माय बाप महाराष्ट्र सरकार
आमच , तुमच पोट भरवनारा राजा संकटात आहे
त्याला मदत तर तुम्ही नक्कीच करु शकता .
माझा शेतकरी राजा काळजीने मरतोय ,
तेव्हा त्याला धीर दया तो आहे म्हणूनच आपण आहोत
गोड धोडं नाहीतर निदान भाजी भाकरिने तरी दिवाळीचा सण सजरा करु द्या
✍कृषिकन्या कुसुम पारटकर
©Kusum P