S

शेतकऱ्याची व्यथा

शेतकरी राज्या नाही तूझ्या कर्तव्याची जाणं
काळ्या आईच्या कुशीत राबतो रात्रंदिन
मृग राज्याच्या कृपेनं
तिफण कचून चाले दिसभर पेरणं
मातीत टाकून बियाणं धान्य देतो पिकवून
रात्रीचा दिस करून भरून देतो गोडाऊन
तूझ्या मुळेच मिळती घास भाकरीचे दोन
शेतकरी राज्या नाही तुझ्या कर्तव्याची जाणं
मातीत टाकून बियाणं जन्म घेतला अंकुराण
सहाव्या दिवशी दिसतात पराटिला दोन पान
तुझ्या मेहनतीनं डोले पांढऱ्या कापसाचं रान
गाणी गाऊन चाले माउल्यांचं चाले कापूस वेचन
कापसापासूनतुझ्या मिले आम्हा वस्त्र अंगभरून
शेतकरी राज्या नाही तुझ्या कर्तव्याची जाणं
तूच अन्नदाता तूच जगाचा प्रधान
तुझ्याच नशिबी का कर्जबाजारी जगणं
तुझ्याच मालाचा दलाल फिरतो चार चाकाच्या गाडीनं
अन तुझ्याच नशिबी का फाटक धोतरं घालून फिरणं
शेतकरी राज्या नाही तुझ्या कर्तव्याची जाणं
शेतमालाला देऊ हमी भाव नुसते खोटे आश्वासन
भूलथापा देऊन त्याचे करता समाधान
निसर्ग राज्याच्या कृपेवर त्यांच जीवन अवलंबून
कष्ट करता करता पार गेला तो सुकून
शेतकरी राज्या नाही तुझ्या कर्तव्याची जाणं

✍️ सुनिल घरडे.
©sunillllll