S

श्वेता

गोर् यांची भाषा (इंग्लिश)शिकविणार् या गोर् या मुलीस आणि नावात, कार्यातही श्वेत/शुभ्रता असणार्या (ही योजना असावी त्याची 😄) ....श्वेतास वाढदिवसाच्या श्वेत शुभ्र शुभेच्छा 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌷शुभ्र मनःपटलावर सज्ञानाचा लेप,
व्यक्तित्व जीचे, सरस्वतीसम श्वेत।
🌷या श्वेत वसनावर , भाषा तंत्रज्ञानाची आखणी,
हे दैवी सौंदर्य, लाखात ती देखणी।
🌷ज्ञानदानी ती खुलते -फुलते,
शिकविताना तीची भाषा सजते,
याच कार्या ती समर्पण मानते,
म्हणूनच ती विद्यार्थी हृदयी मुरते।
🌷मग तो सोहळा अद्वैताचा,
सर्वत्र ज्ञान प्रकाश श्वेताचा,
उजळवी वाटा अज्ञानाच्या,
कधी न चूकल्या स्व दायित्वाचा।
🌷जीवन रसग्रहण ती जाणे,
चित्रपट नाट्य सोबत गाणे,
नानाविध पदार्थ खाऊ घालणे,
क्षणोक्षणी जगणे अन् केवळ जगणे।
अशा सकारात्मक उर्जेस, श्वेत- शुभ्र शुभेच्छा ...
तुझी मैत्रीण,
सोनाली खर्चे 😍
©sonchapha