S

संग सद्गुण सत्कार्माचा

ओंजळीतल्या मोगऱ्या फुलांनी
त्या ओंजळीलाही गंध यावा
सद्गुण, सत्कार्माचा सत्संग घडावा
घडला जरी क्षणिक सहवास
प्रत्येक क्षणाला मान मिळावा
जीवनात तो अविस्मरणीय क्षण ठरावा
ओंजळीतल्या मोगऱ्या फुलांनी ,
त्या ओंजळीलाही गंध यावा
चेहरा कुणाचा बघता
चेहऱ्यात काय दडलंय
मनात उतरून बघता
माणुसकीचा साक्षात्कार घडावा
ओंजळीतल्या मोगऱ्या फुलांनी
त्या ओंजळीलाही गंध यावा
सौंदर्याला तूझ्या वयाच बंधन असतं
मनाच्या सौंदर्याला कसलंही प्रमाण नसतं
मनात जर असेल गोडवा
प्रत्येकाला वाटे संगतीचा योग जुळावा
सोबतीन तुझ्या क्षण अन क्षण हवा हवासा वाटावा
ओंजळीतल्या मोगऱ्या फुलांनी
त्या ओंजळीलाही गंध यावा
सज्जनाची घडता संगत
सदगुणाची जतन करावी
तीच जीवनाची कमाई समजावी
सत्कर्म, सद्गुनाचा सत्संग घडावा
ओंजळीतल्या मोगऱ्या फुलांनी
त्या ओंजळीलाही गंध यावा
सुनिल घरडे
©sunilll