उरावर घे माझे मायबाप
जेव्हा मी एकटा होतो,
तूच माझा जीवाचा तूकडा
जेव्हा मी सडा होतो.
लग्न झाल आली घरी बायको
आता मी परका झालो होतो,
जगा सांगे माझा बाळ
बायको मूळे वेडा होतो.
मायबापावर माझ जीवापाड प्रेम
मायबाप नित्य मारे टोमणा,
माझ्या सूनाने मूलाचा केला गेम.
आता सांगा कूणाच ऐकायच
बाईचा ऐकाव तरीही,
मायबापाच ऐकाव तरीही,
मी माणूस वाईट आहे.
संसारात घराघरात 👊 आहे.
हे साऱ्यांशी घडत
कोणाच पितळ उघडत,
कोणाच्या घराघरात जळत.
न ढाल न तलवार
शब्दाच द्वंद आणिक मार्मिक वार,
लढाव तर लागेलच
कारण हा संसार हा संसार .
कवी- सचिन बाबूराव ठाकरे (सरकार)८४५९८०९४५०
T