भिरभिरनारं एक पाखरू
नजरेत माझ्या पडलं ,
सुंदर ते रूप त्याचं
मनामध्ये दडलं.
दुसरीकडे नसे मन
तिच्या भोवतीच फिरायचं,
एक लहानसं हसुच तिचं
मला उरून पुरायचं.
बघता बघता तिच्याकडे
पूर्ण तीन वर्षे गेली ,
पण मन मोकळं करायची
कधी हिंमतच नाही केली.
घरच्यांसोबतच नशीबही माझं
मला विरोध करत होतं,
प्रेमाचं हे चक्कर माझं
माझ्या भोवतीच फिरत होतं.
शेवटच्या दिवशी का होईना
म्हटलं तीला सांगुन टाकावं,
एवढं मोठं ओझं आपल्या
मनावर का राखावं.
ज्याची मला होती भीती
तोच वेळ माझ्यावर आला,
नशीब होतं खोटं माझं
तो पेपरच रद्द झाला.
एवढं मोठं दुःख मी
फार जवळून पाहिलं,
आणि शाळेतील प्रेम माझं
शेवटी अपूर्णच राहिलं.
-शिवम्
©shivame
S