S

स्त्री प्रत्येक नात्याचं रूप

स्त्री हे प्रत्येक नात्याचं रूप असते
तिला संसारात प्रत्येक नातं जपायचं असते
नशिबानं थोर असलेल्यालाच हे रत्न लाभते
जन्म तिचा झाला असता ती एक मुलगी असते
तू दिलेले धडे आणि नियमाचं ती पालन करत असते
संस्कारी आणि सद्गुणी मुलीचं दर्शन तिला घडवायचं असते
स्त्री हे प्रत्येक नात्याचं रूप असते......
तारुण्यात पदार्पण होता नवीन जीवनाची चाहूल लागते
माहेरची माया सोडून सासरची छाया लाभते
सद्गुण आणि सत्काराच्या मार्गाने स्वप्न रंगवायचं असते
सर्वगुणसंपन्न असलेल्या पत्नीचं तुला दर्शन घडवायचं असते
स्त्री हे प्रत्येक नात्याचं रूप असते.......
संसाराच्या वाटेवर तुला आई होण्याची चाहूल लागते
आईच रूप घेऊन तुला एका रत्नाला जन्म द्यायचा असते
एक संस्कारूपी आई म्हणून आईच दर्शन घडवायचं असते
या जगाला महान थोर रत्न दिल्याचं भाग्य तुला लाभते
म्हणून स्त्री जन्माचा आदर केलाच पाहिजे कारण
स्त्रीच रूप प्रत्येक नात्यात दिसते
स्त्री हे अनेक नात्याचं रूप असते

-सुनिल घरडे
©sunilll