जीवनात जेवढे सुखाचे क्षण येतात
तेवढेच दुःख पण येऊन जातात
माणूस बघतो नेहमी सुखाची लहर
नको असतो त्याला दुखःचा कहर
पण नशीबाने कुणाला सोडले नाही मोकाट
आयुष्य घेऊन येतं सुखदुःखाची वाट!
जीवन हे आहे संघर्षमयी प्रवास
सगळ्यांनाच असते सुखाची आस
नको आहे कुणालाच दुखःद त्रास
असं जीवन कुठं मिळणार, कुणाचं आहे थाट
आयुष्य घेऊन येतं सुखदुःखाची वाट!
नशीबाने कुणाच्या जीवनात भरपूर सुख
नाही तर असते कुणाला मरणाचे दुखः
सुखदुःख जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला येत
एका मागून एक येणार हे नक्की होतं
कधी नाही फीरवली या सुखदुःखा नी पाट
आयुष्य घेऊन येतं सुखदुःखाची वाट!
✍️..@उमेंद्र बिसेन@..✍️
©ubisen
U