S

सूर्य

आहे तो तेजस्वी सूर्य ।।
त्याच्याकडे आहे शौर्य ।।१।।

म्हणतो आपण त्याला रवी ।।
त्याला पाहतो फक्त कवी ।।२।।

देतो तो आपल्याला प्रकाश ।।
घाबरतो अजूनही त्याला आकाश ।।३।।

आहे तो पृथ्वी वरील जीवन ।।
करतो तो मानवाला पावन ।।४।।

तोच जगावतो आपल्याला ।।
तोच उगवतो धान्याला ।।
तोच गरम करतो पाण्याला ।।
तोच पाठवतो पाण्याला ।।५।।

उन्हाळ्यात तो तापतो ।।
पावसाळ्यात तो लपतो।।
हिवाळ्यात अर्धवेळ येतो।।
थंडीतच तो आपल्याला समजतो ।।६।।

आहे तो सुर्यमालेचा मध्य ।।
करतो तो प्रत्येक गोष्ट साध्य ।।७।।

आहे तो सुर्यमालेच भास्कर ।।
म्हणतो आपल्याला तो काम कर ।।८।।
©shivam.22