जे शिजलं भिजलं अन ताटात आलं तेच खरं आहे
त्यातच गोडवा स्वाभिमान अन समाधान आहे
नको ते लाचारीच पक्वान्न इमानाच्या मीठ भाकरीतच कमालीची रुची अन स्वाद आहे
अनीतीने कमावलेल्या तूप रोटीपेक्षा समाधानाणे मिळालेली चटणी भाकरी मस्त आहे
स्वार्थाने गोंधळलेल्या मखमली गादी पेक्षा विचार आणि आनंदानी शिवलेली रजईच मस्त आहे
तिच्यावरच शांत झोप अन आरोग्याच समधान आहे
जळत्या विचारांनी भरलेल्या हवेली पेक्षा विचाराची सांगड असलेली झोपडीच मस्त आहे
तेथेच माया अन प्रेम आहे
चारित्र्याला कलंकित करून धन कमवल्या पेक्षा स्वाभिमानाणे मिळालेल्या अर्ध्या भाकरीतच खरा आनंद आहे
सुनिल घरडे
©sunilll
Poet: sunilll
©sunillllll
S