जिवन तुझे नी माझे
प्रेममय बनवशिल का?
संसारी रंग माझे भरशील का?
सात जन्माच्या गठबंधनात बांधशील का?
रुसून माझ्यावर बसशील का?
तूच माझी जिवन सखी
तुचं माझी अर्धांगिनी
तुझाच अधिकार गाजवशील का?
रुसून माझ्यावर बसशील का?
मी वर अन तु वधू
अग्नी साक्षीने सात फेरे
सोबत माझ्या घेशील का ?..... संसारी स्वप्नं माझे रंगवशील का?
रुसून माझ्यावर बसशील का?
सुनिल घरडे
©sunilll
S