आला श्रावण श्रावण,
संगे पाऊस घेऊन
पहिल्या पावसाची पहीली सर,
अंगी झेलून घ्याव्या कोसळणारया धारा..
आठवे स्वप्नमयी मज भासे पहिला पाऊस,
वारा झोंबु लागे अंगी, कानामधे साठवून घ्यावे,
गडगडणारे मेघ,
स्वप्नात रोज पाहते तु, मी आणि पाऊस,
कसल विलक्षण नात होत त्यासंगे,
तु जवळ असताना तो बेधुंद होऊन यायचा,
तु दूर गेलास की तो क्षणांत ढगाआड जाऊन लपायचा,
मग आठवे तोच तुझा अट्टाहास तेच भांडण,
पण त्या बरसणारया सरीमधे विरून जाई सारे,
रुसणं फुगणं आणि तुझ पावसात भिजुन जाण.
मग आपण डोळयांनीच खुप काही बोलायचो,
मला असह्य व्हायचे एकटक तुझ्या डोळ्यात पाहणे, माझ पहील प्रेम तुझे मादक नयन..
क्षणभराचे ते क्षण विसरुन खुदकन हसायचो,
कालांतराने तोच पाऊस एकाएक गायब झाला,
मेघासवे पसार झाला,
मी त्याची तीव्रतेने वाट पहात होते,
आज येईल उद्या येईल, हुरहुर ही मनात होती,
सूर्य माथ्यावर आला ,
श्रावणात वणवा भाजू लागला,
आपलं त्याच्याशी काहीही न बिनसता,
तो आपल्याला सोडून गेला,
तसाच कालांतराने तु ही दुरावलास,
माझं तुझं करुन भांडण,
हात सोडून निघुन गेलास,
त्याच क्षणापरी तो फक्त डोळ्यांतूनच वाहू लागला,
पाऊस मात्र गारांबरोबर तुझी आठवण घेऊन यायचा,
मनाचा उद्रेक व्हायचा तेव्हा मी कडाडून त्याच्याशीच भांडायचे,
यायचं असेल तर एकटा ये ,
त्याच्या आठवणी आणू नको सोबत,
अशी रोज मी अलिप्तपणे खिडकीत उभी असते,
पाऊस येतो आणि जातो पण कुठे गेले ते बेधुंद करणारे क्षण,
तु कदाचित असशील कुठल्यातरी खिडकीत,
थंडगार पावसाचे थेंब झेलत,
पण अजुनही तुझे ते मादक नेत्र,
विसरता येत नाहीत..।
तु, मी आणि पाऊस कसलं विलक्षण नात होत आपलं..
संजल..
सीमा रावराणे.
©sanjal
S