भरून आले आभाळ ढगांनी
अलगद तुझी आठवण येते,
होताच स्पर्ष गार वाऱ्याचा अंगाला
स्पर्षात तुझी आठवण येते...
कोसळत्या सरिंना बघुन
नेहमीच तुझी आठवण येते,
मनात असते त्यात भिजावं
म्हणुन तुझी आठवण येते...
अंगावर घ्यावंसं वाटतं थेंबाना
क्षणात तुझी आठवण येते,
शहारून जाते अंग जेव्हा थेंबांनी
प्रत्येक थेंबात तुझी आठवण येते...
वाटते मोकाट फिरावं पावसात अश्या
तेव्हा तुझी आठवण येते,
हाती घेऊन हात तुझा वाटेनं चालावं
चालतांना ती वाट नकळत तुझी आठवण येते...
बघावं कधी इंद्रधनू सोबत तुझ्या
लगेच तुझी आठवण येते,
हरवून जावं त्याच वाटेवर
नाही तु सोबत तर तुझी आठवण येते...
✍️: कविश्वर झलके , ३०/८/१९
©kavishwar
K