धन दौलत दुपारची सावली
ती तुझी झाली ना माझी झाली
नको अहंकार श्रीमंतीचा
सांभाळ तोल तुझ्या मनाचा
माणुसकी तुझी कलंकित झाली
जीवनात तुझी भूमिका तुलाच नाही कळली
धन दौलत दुपारची सावली
ती तुझी झाली ना माझी झाली
जिवन मोह मायेचा पसारा
सुख समाधानाचा नाही किनारा
स्वार्थाच्या चक्रव्यूहात तुझी प्रतिमा हरवली
तुझी प्रतिमा तूच नाही ओळखली
धन दौलत दुपारची सावली
ती तुझी झाली ना माझी झाली
संपत्तीची लागता हाव
संघर्षमय जीवनात तुझी मती धुंद झाली
अंतिम क्षणी आत्म्याने देहाची साथ सोडली
अरे जळत्या सरणावर देहाचीही राख झाली
धन दौलत दुपारची सावली
ती तुझी झाली ना माझी झाली
सुनिल घरडे
©sunilll
S