तू नदी आहेस..
वहात जा..
दगड धोंडे काटे कुटे
मधे येतील;
खुपतील.. काचतील..
दऱ्या खोऱ्यात
कट शिजतील,
नको नको म्हणत म्हणत
तुझी मुळं खोदून शोधतील..
वाकू नकोस, थकू नकोस
कोणासाठी थांबू नकोस
आतून हस, हिरवळ आण
चिडशील तेव्हा प्रलय आण
सारं काही पोटात घे
परत तितकीच माया दे..
झाडांचं, लेकरांचं
एवढं गाणं गात जा..
तू नदी आहेस..
वहात जा..
✍️विकासपर्व
©vikasraut
V