S

वादळं जीवनाचं

संपेल ना कधीही मोहाचा पसारा
धावत्या मनाला लागेल का किनारा
वाऱ्यातले ते वादळंही हळूच थांबले
पण मनातील भावनांचे पेव नाही भरले
मिळेल का तुला मनाचे कोडे सोडणारा
संपेल ना कधीही मोहाचा पसारा
धावत्या मनाला लागेल का किनारा
पावसाच्या सरीने दिसेल सागरही भरलेला
पण जीवनातल्या आशा अन अपेक्षांचा अंत नाही लागला
मिळेल का तुला इच्छा अन आकाकांशा पुरवणारा
संपेल ना कधीही मोहाचा पसारा
धावत्या मनाला लागेल का किनारा
मोह माया मत्सर आस लावतील आतुरत्या मनाला
सावरेल का माणूस तुझ्यातल्या माणसाला
मिळेल का कुणी तुझ्या जीवनाला सावरणारा
संपेल ना कधीही मोहाचा पसारा
धावत्या मनाला लागेल का किनारा
सुनिल घरडे
©sunilll