नको आम्हा धनाची तिजोरी
आम्ही ज्ञानाचे पुजारी
श्रद्धा आमची कर्मावरी
कर्माचे धनी आम्ही फळाचे मानकरी
वास्तवाचे आम्ही वाटेकरी
नको आम्हा धनाची तिजोरी
आम्ही ज्ञानाचे पुजारी
अंधश्रद्धा असे विनाशकारी
उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघून
जीवनाचे स्वप्न सत्यात उतरवणारी
नको आम्हा धनाची तिजोरी
आम्ही ज्ञानाचे पुजारी
जिवंत माय बाप हेच खरे देव
त्यांची सेवा हीच खरी जिम्मेदारी
कावळ्याला घास टाकणे ही मानसिक बिमारी
नको आम्हा धनाची तिजोरी
आम्ही ज्ञानाचे पुजारी
सुनिल घरडे
8355904972
©sunilg
S