देव अन देव प्रत्येक देव पूजला
देवदेव करता देव नाही भेटला
का म्हणून पुजावे दगड धोंड्याला
वास्तवात देव बापातच दिसला
माय अन बापच खरे दैवत
त्यांच्या पुण्याईन मानव जन्म लाभला
पावलो पावली बाप माह्यासाठी झटला
जीवन माझं घडवण्यात कमी नाही पडला
का म्हणुन पुजावे दगड धोंड्याला
खऱ्या वास्तवात देव बापातच दिसला
संस्कार देऊन दिला आकार जीवनाला
माया त्याची अपार खरा जन्मदाता पाहिला
दुःख अन सुखात खरा धनवान ठरला
का म्हणून पुजावे दगड धोंड्याला
खऱ्या वास्तवात देव बापातच दिसला
रात्रंदिवस कष्ट करून वाट नाही चुकला
पडला कुठे कमी तर अश्रू चोरून रडला
माणूसपनाच्या वाटेवर नीतिमन्त ठरला
जीवन जगण्यासाठी माझा बापच आदर्श ठरला
का म्हणून पुजावे दगड धोंड्याला
खऱ्या वास्तवात देव बापातच दिसला
देव अन देव प्रत्येक देव पूजला
का म्हणून पुजावे दगड धोंड्याला
खऱ्या वास्तवात देव बापातच दिसला
सुनिल घरडे
9820884759
©sunilg
S