पुरंदर ला जन्मला शिवबांचा छावा सांभाजी,
छत्रपति शिवाजी ज्याचे वडील अणि जिजाऊ ज्याची आजी|
२ वर्षांच्या वयात हरवला ज्याने आई ह्या छत्रा ची छाया,
लाभली त्याला शिवबांची छाया अणि आऊसाहेबांची माया|
रचला ज्याने १४ वर्षाच्या वयात बुधभूषण हा ग्रंथ,
का रचले गेले त्याच्या विरुद्ध अनेक जहरी मंत्र|
काय ते पराक्रम, काय ते शौर्य, काय ते धैर्य,
कसे असतिल शंभुराजे, याचाच आम्हाला आश्चर्य|
कधी झुकला नाही, कधी नमला नाही, लढत राहिला तो जंग,
९ वर्ष लढला, पण १ किल्ला नाही घेऊ शकला बादशाह औरंग|
अखेर अढकला आमचा राजा औरंगजेबच्या जाळात,
कारण आपल्याच काही लोकांनी दिली औरंग्या ची साथ|
पण झुकला नाही राज, विकला नाही इमान,
गर्दन छाटली राज्यांची, पण ताट होती त्यांची मान|
©dhananjay1
D