करोना नावाचा एक
राक्षस जगात आला ,
फिरता फिरता पृथ्वीचा
चक्का जाम झाला .
एवढ्याशा विषाणूने जग
बंद करून टाकले ,
मोठमोठे देशसुद्धा
याच्यासमोर वाकले .
सर्वांसोबत आता
आपली पण बारी,
एवढं मोठं संकट आता
आपल्या पण दारी .
शक्तीनिशी देश आपला
करोनाला रेटतोय ,
नशीब चांगले माना
वेळ तरी भेटतोय .
एकीकडे भितीने जग
सारे रडत आहे ,
दुसरीकडे माणूस आपला
घराबाहेर पडत आहे .
काळजी घ्या स्वतःची
घर आता सोडू नका ,
करोनाला बाहेर काढा
तुम्ही बाहेर पडु नका .
घराबाहेर पडायला
जरी आता बंदी आहे ,
तरी देश वाचवायची ही
खुप मोठी संधी आहे .
नक्कीच एक दिवस
हे संकटही टळेल ,
आपल्याला घरातून
मुक्तीही मिळेल .
©shivam.e.
S