S

माझ्या 'बा' ची बापूलकी..

बघत असतो नेहमीच त्यांच्या डोळ्यात इच्छा मी यशस्वी होण्याची ।
देवापुढे ही नेहमी भिख मागत असतो माझे
स्वप्न पूर्ण होण्याची।।
लहानाचा मोठा केला मला अलगद हृदयात जपून।
खरंच सांगतो बाबा माझं उभं आयुष्य ठेवतो मी तुमच्यासाठीच राखून।।
स्वतःच्या वाट्याचा घास तुम्ही मोट्या प्रेमाने मज भरविला।
त्या घासाला जागूनच बाबा मी माझ्या आयुष्याचा पण ठरविला।।
जरी आज नसले काही माझ्याकडे तरी बाबा
मनात आग आहे मोठी
झिजवेल मी माझे पूर्ण आयुष्य तुमच्या प्रत्येक
सुखासाठी।।
बाबा तुमचाच बापपणा मी एकदिस माझ्यात घेईन ।
अडखळताक्षणी श्वास तुमचा। तुमच्या श्वासात श्वास मी देईन।।
इच्छा एवढीच, प्रत्येक जन्मोजन्मी माझाच बाप तुम्ही असावे।
आणि त्या बापपणाला जागून लेकाचे कर्तव्य सुद्धा मीच पूर्ण करावे।।
धान्य झाला आज माझा देह तुमच्या संस्कारात वाढून ।
बनवेल तुमचे जीवन सार्थक हेच असेल
सुनीलानंदाचे महावचन ।।
...सुनीलानंद
©snkangule