N

मावशी

प्रत्येक तक्रार आपण आईची,
तिच्याकडे जाऊन करतो,
आई नंतर विश्वासाने दुसरा हात,
आपण मावशीचाच तर धरतो.
प्रत्येक गुपित आपण,
तिला जाऊन सांगतो,
सखी परी आपण,
मावशीशीच तर भांडतो.
सुखदुःखाच्या प्रत्येक वेळात,
कायम आठवते मावशी,
आयुष्यातील प्रत्येक क्षण,
नेहमी वाटते ती हवीशी.
जशी तप्त उन्हात,
आस सावलीची,
तशीच मावशी म्हणजे,
प्रतिरूप माऊलीची.
©navi07